पीठ कांडते राक्षसी
तसें कडाडतें ऊन :
प्राणसई घनावळ
कुठे राहिली गुंतून?
दिला पाखरांच्या हातीं
माझा सांगावा धाडून :
ये ग ये ग घनावळी
मैत्रपणा आठवून...
पडवळा-भोपळ्यांचीं
आळीं ठेविलीं भाजून,
हुडा मोडून घरांत
शेणी ठेविल्या रचून,
बैल झाले ठाणबंदी,
झाले मालक बेचैन,
तोंडे कोमेलीं बाळांचीं
झळा उन्हाच्या लागून,
विहिरीच्या तळीं खोल
दिसूं लागलें ग भिंग,
मन लागेना घरांत :
कधी येशील तू सांग?
ये ग दौडत धावत
आधी माझ्या शेतावर :
शेला हिरवा पांघर
मालकांच्या स्वप्नांवर,
तशी झुलत झुलत
ये ग माझिया घराशीं :
भाचे तुझे झोंबतील
तुझ्या जरीच्या घोळाशीं,
आळें वेलाचें भिजूं दे,
भर विहीर तुडुंब :
सारें घरदार माझें
भिजूं दे ग चिंब चिंब;
उभी राहून दारांत
तुझ्या संगती बोलेन :
सखा रमला शेतांत
त्याचे कौतुक सांगेन...
कां ग वाकुडेपणा हा,
कां ग अशी पाठमोरी?
ये ग ये ग प्राणसई
वाऱ्यावरून भरारी.
Also Read :
इंदिरा संत (१९१४ ते २०००) :
कवयित्री, कथाकार, ललित लेखिका. लहानवयापासून वाङ्मयाचे संस्कार. उत्कट, भावपूर्ण आणि प्रतिभासंपन्न काव्यशैली. ‘सहवास’ हा पहिला प्रकाशित काव्यसंग्रह. ‘शेला’, ‘मेंदी’, ‘मृगजळ’, ‘रंगबावरी’, ‘बाहुल्या’, ‘गर्भरेशीम’ इत्यादी
कवितासंग्रह प्रसिद्ध. ‘श्यामली’, ‘चैतू’ हे कथासंग्रह व ‘मृदगंध’, ्‘मालनगाथा’ हे ललित लेखसंग्रह प्रसिद्ध. त्यांच्या ‘गर्भरेशीम’ या कवितासंग्रहास साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित केले आहे.
उन्हाळा संपत आलेला असला तरी त्याचा ताप अजूनही असह्य आहे. पावसाळा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. घराघरांत, शेताशेतांवर आवश्यक पूर्वतयारी झाली आहे.
अशा वेळी पावसाळ्यापूर्वीच्या स्थितीचे वर्णन करताना कवयित्रीने या कवितेतून मैत्रिणीच्या नात्याने घनावळीला म्हणजे मेघमालेला केलेले आवाहन, धाडलेला निरोप भावरम्य आहे. ग्रामीण भागातील
घराघरांतून केल्या जाणाऱ्या पावसाळ्यापूर्वीच्या तयारीचे वर्णन समर्पक शब्दांत कवितेत आले आहे. ही तयारी झाल्यावर पावसाची आळवणी केली आहे.
प्रस्तुत कविता अष्टाक्षरी छंदात असून दुसऱ्या व चौथ्या चरणात यमक साधलेले आहे.
प्राणसई मराठी कविता स्वाध्याय
अनुक्रमणिका / INDIEX
पाठ कविता | स्वाध्याय LINK |
---|---|
01: जय जय हे भारत देशा (गीत) | Click Now |
02: बोलतो मराठी… | Click Now |
03: आजी : कुटुंबाचं आगळ | Click Now |
04: उत्तमलक्षण (संतकाव्य) | Click Now |
05: वसंतहृदय चैत्र | Click Now |
06: बालसाहित्यिका : गिरिजा कीर (स्थूलवाचन) | Click Now |
07: वस्तू (कविता) | Click Now |
08: गवताचे पाते | Click Now |
09: वाट पाहताना | Click Now |
10: आश्वासक चित्र (कविता) | Click Now |
11: आप्पांचे पत्र | Click Now |
12: मनक्या पेरेन लागा (स्थूलवाचन) | Click Now |
13: गोष्ट अरुणिमाची | Click Now |
14: भरतवाक्य (कविता) | Click Now |
15: कर्ते सुधारक कर्वे | Click Now |
16: काळे केस | Click Now |
17: खोद आणखी थोडेसे (कविता) | Click Now |
18: वीरांगना (स्थूलवाचन) | Click Now |
19: आकाशी झेप घे रे (कविता) | Click Now |
20: सोनाली | Click Now |
21: निर्णय | Click Now |
22: तू झालास मूक समाजाचा नायक (कविता) | Click Now |
23: सर्व विश्वचि व्हावे सुखी | Click Now |
24: व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन) | Click Now |
10th marathi digest pdf download - 10th marathi digest pdf download
Tags:
मराठी कविता
very nice post
ReplyDelete